राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:19 PM2020-07-10T14:19:21+5:302020-07-10T14:48:23+5:30

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

education minister varsha gaikwad announced dates of state ssc and hsc board exam results | राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान

राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान

googlenewsNext

मुंबई: कोरोनाचं संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबद्दलची माहिती दिली. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शैक्षणिक क्षेत्रालादेखील बसला आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. निकालाला विलंब झाल्यानं आता पुढील प्रवेशालादेखील उशीर होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यापैकी मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे. 

कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हा बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचा भूगोलाचा पेपर कोरोनामुळे रद्द झाला. या पेपरचे गुण सरासरी पद्धतीनं दिले जाणार आहेत. शासनानं शाळा महाविद्यालयानं अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीचे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यावं लागतं. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबद्दल शासन काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचे आहे.
 

Web Title: education minister varsha gaikwad announced dates of state ssc and hsc board exam results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.