शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

कोरोना संकटात शिक्षण खात्याला मन:शांतीचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:33 IST

शोधमित्रा उपक्रम : राज्यातील प्रत्येक अधिकारी, शिक्षकाला विपश्यना प्रशिक्षण

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे सध्या सर्वत्र मानसिक दडपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून विद्यार्थी आणि शिक्षकही सुटलेले नाहीत. त्यामुळे राज्याचा शिक्षण विभाग आता मन:शांतीचा शोध घेणार असून त्यासाठी राज्यातील प्रत्येक शिक्षक आणि अधिकाऱ्यांना विपश्यना साधनेचे प्रशिक्षण दिले जाणारआहे.

सध्याच्या कोविडसारख्या महामारीच्या प्रसंगात समाजातील प्रत्येक घटक अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरा जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी मन शांत आणि संतुलित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकाने आणि अधिकाºयाने विपश्यनेतील आनापान साधना करावी, असा कार्यक्रम शिक्षण आयुक्तालयाने हाती घेतला आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना या साधनेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी २४ आणि २५ सप्टेंबर असे दोन दिवस सकाळी ७ ते ९ असे दोन तास आॅनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. मित्रा (माइंड इन ट्रेनिंग फॉर अवेअरनेस) उपक्रमांतर्गत होणाºया प्रशिक्षणासाठी इगतपुरी येथील विपश्यना विशोधन केंद्राचे सहकार्य घेतले जाणार आहे. सहभागी होण्यासाठी सध्या नोंदणीची मोहीम सुरू करण्यात आली असून प्रत्येक शिक्षकाला सहभागी करण्याची जबाबदारी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षणाधिकारी आणि डाएट प्राचार्यांवर सोपविली आहे. विशेष म्हणजे यात शिक्षक, अधिकारी यांना आपल्या कुटुंबीयांनाही सहभागी करता येणार आहे.कुणा-कुणाला संधी?या प्रशिक्षणात प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्याता, प्राचार्य, विभागीय उपसंचालक आदींसह त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार आहे.

दोनच दिवसांत ४३ हजारांची नोंदणीकेवळ दोन दिवसांत शिक्षण विभागातील तब्बल ४३ हजार ३१९ लोकांनी नोंदणी केल्याचे या कार्यक्रमाचे समन्वयक महेंद्र गायकवाड यांनी सांगितले. नोंदणीसाठी आणखी तीन दिवस शिल्लक आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण