विद्यार्थिनीला दिली तब्बल १२० उठाबशांची शिक्षा

By Admin | Updated: September 10, 2016 06:03 IST2016-09-10T06:03:45+5:302016-09-10T06:03:45+5:30

हेअरबॅण्ड लावून शाळेत न आलेल्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीला १२० उठाबशांची शिक्षा सुनावल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये गुरुवारी घडला.

Education for 120 students | विद्यार्थिनीला दिली तब्बल १२० उठाबशांची शिक्षा

विद्यार्थिनीला दिली तब्बल १२० उठाबशांची शिक्षा


अंबरनाथ : हेअरबॅण्ड लावून शाळेत न आलेल्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीला १२० उठाबशांची शिक्षा सुनावल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये गुरुवारी घडला. या शिक्षेमुळे तिला चालणेही अशक्य झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जेहान शेख असे विद्यार्थिनीचे नाव असून मदनसिंग मनवीरसिंग या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती शिकते. गुरुवारी शाळेत येताना जेहान हेअरबॅण्ड लावायला विसरली. त्यामुळे शिक्षिकेने तिला ६० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यानुसार जेहानने उठाबशा काढल्याही. मात्र शिक्षिकेचे लक्ष नसल्याने तिला पुन्हा ६० उठाबशा काढायला लावल्या. या शिक्षेमुळे जेहानची प्रकृती बिघडल्याने पालकांनी तिला छाया रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Education for 120 students