शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीची धाड, आव्हाडांचा अजितदादांवर नाव न घेता निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:28 IST

ED's raid on Rohit Pawar's Baramati Agro: आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीवर आज ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीवर आज ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बारामती अ‍ॅग्रोवर ईडीने टाकलेल्या धाडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात आव्हाड यांनी रोहित पवार यांचा शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आव्हाड म्हणाले की,  रोहित  पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीची धाड पडल्याची बातमी समजली. रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहिले त्याचे हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित पवार हे या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाहीत, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील.

दरम्यान, पिंपळी (ता. बारामती)येथील बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्या, असे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र या धाडीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारBaramatiबारामतीJitendra Awhadजितेंद्र आव्हाड