शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

‘ॲमवे’ला ईडीचा दणका; देशव्यापी कारवाईत ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 6:11 AM

४११.८३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच ३६ बँक खात्यांतील ३४५.९४ कोटी रुपये जप्त  करण्यात आले.

मनोज गडनीस -

मुंबई : ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’चे व्यवहार केल्याचा ठपका ठेवत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘ॲमवे’ कंपनीला जोरदार दणका दिला. देशव्यापी कारवाई करीत ईडीने मुंबईतील बँक व्यवहारासह एकूण ७५७ कोटी ७७ लाख रुपयांची कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. ४११.८३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच ३६ बँक खात्यांतील ३४५.९४ कोटी रुपये जप्त  करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरॅमिड रचनेद्वारे देशभरात तब्बल साडेपाच लाख वितरक-एजंटांच्या माध्यमातून उत्पादनांची थेट विक्री करण्याच्या नावाखाली बंदी असलेल्या ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’चे व्यवहार ‘ॲमवे’ने केल्याचे आढळले आहे. ग्राहकाला उत्पादनांची थेट विक्री केल्यास मिळणाऱ्या घसघशीत कमिशनवर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जात होते. परिणामी, कंपनीचे सदस्य उत्पादनांची विक्री करतानाच नवे सदस्य जोडत अधिक कमिशन प्राप्त करण्यासाठी काम करत राहतात. सदस्यांना द्याव्या लागणाऱ्या कमिशनमुळे बाजारातील स्पर्धक उत्पादनांपेक्षा कंपनीच्या किमती जास्त असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

असे चालायचे व्यवहारकंपनीने साकारलेल्या पिरॅमिड रचेनत सर्वात वर असलेल्या व्यक्तीस अधिक, तर खालच्या व्यक्तीस कमी पैसे मिळतात. मात्र, हे पिरॅमिड कोसळल्यास सर्वांनाच फटका बसतो. बहुतांशवेळा खाली सर्वसामान्य लोक असतात. अशा लोकांना त्याचा मोठा फटका बसतो. केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण (थेट विक्री) २०२१ नियमांतर्गत अशा विक्रीवर बंदी घातली आहे. 

मनी लाँड्रिंग अंतर्गतही तपासकंपनीने २००२-०३ ते २०२१-२२ या वीस वर्षांच्या कालावधित एकूण २७ हजार ५६२ कोटी रुपये व्यवसायातून मिळविले आणि यापैकी ७,५८८ कोटी रुपये कमिशनपोटी वितरक तसेच भारत, अमेरिकेतील एजंटांना दिले. याप्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गतही तपास सुरू आहे. 

असे चालते कंपनीचे काम...- कंपनीतर्फे शानदार हॉटेलमध्ये लोकांना बोलावले जाते. कंपनीचे वितरक, एजंट कंपनीच्या उत्पादनांची विक्री करून आपण कसे श्रीमंत झालो, याच्या कथा लोकांना सांगतात. - उत्पादने विकून कसे श्रीमंत होता येते, याचे स्वप्नदायी चित्र दाखवले जाते. सर्वप्रथम कंपनीची महागडी उत्पादने खरेदी करत वितरक व्हावे लागते. त्यानंतर उत्पादनांची विक्री करता येते. यालाच पिरॅमिड पद्धतीचे ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणतात. 

प्रशिक्षक कंपन्याही रडारवर२०११ पासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. तेव्हापासून कंपनीने तपास यंत्रणांना सहकार्य करत, हवी ती सर्व माहिती दिल्याचे ‘ॲमवे’ने निवेदनाद्वारे सांगितले आहे. वितरक व एजंटांना प्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या ब्रीट वर्ल्डवाईड इंडिया प्रा. लि. आणि नेटवर्क ट्वेन्टी वन या कंपन्याही आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत.

१९९८ पासून कारभार‘अमेरिकन वे’ या शब्दावरून ‘ॲमवे’ असे कंपनीचे नाव पडले. अमेरिकेत सन १९५९ मध्ये स्थापन झालेली ॲमवे कंपनी भारतात १९९५ साली सुरू झाली. पण, प्रत्यक्ष व्यवहार १९९८ पासून सुरू झाले.

काय जप्त?तामिळनाडूमधील दिंडीगूल जिल्ह्यातील फॅक्टरी, जमीन, मशिनरी, वाहने, मुदत ठेवी, बँक खात्यातील पैसे आदींचा जप्तीमध्ये समावेश आहे.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाड