ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 02:04 PM2020-12-09T14:04:58+5:302020-12-09T16:45:12+5:30

प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता...

This 'ED' will end BJP: Dhananjay Munde | ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

ही ‘ईडी’च भाजपाला संपवल्याशिवाय राहणार नाही : धनंजय मुंडे

Next

पुणे(पिंपरी) : प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता. आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यांपर्यंत जायचं. कुठेही ‘ईडी’चा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचं चाललयं आहे. ही ईडी’च त्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

 खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ  उपस्थित होेते.

 मुंडे म्हणाले, हे केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी, शेतमजूर कामगारांच्या विरोधातील  आहे. सुरुवातीला विश्वास देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत डोक्यावर घेऊ. मात्र हेच पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकरी आणि कामगार मजुरांना पायाखाली तुडवतात. याचा प्रत्यय आता सुरू असलेल्या आंदोलनात होतोय. शेतकऱ्यांच्या बाबत केंद्रांने जो कायदा केला आहे, तो कायदा शेतकऱ्यांना पूर्णपणे संपवणार आहे. उद्या जर शेतकरी संपला तर हा कृषीप्रधान असलेला देश संपणार आहे."

शरद पवार यांनी  उभ्या देशाला लोकशाहीचं दर्शन घडवले... 

या घडीला लोकशाहीमध्ये ६४ जागा मिळ्वणाऱ्यांचा मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आणि ४४ आमदार ज्यांचे आहेत त्यांचा मंत्री होतो. पण दुसरीकडे १०५ जागा असणाऱ्या पक्ष विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचं उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं ही म्हण आजपर्यंत फक्त ऐकत होतो. पण, विधानसभेच्या निवडणुकीत ज्याचं होत त्याचं नव्हतं कसं झालं आणि ज्याचं नव्हतं त्याचं होतं कसं झालं हे शरद पवार यांनी प्रत्यक्षपणे दाखवून दिले. 

Web Title: This 'ED' will end BJP: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.