शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh BREAKING: नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 09:50 IST

ED raids former Home Minister Anil Deshmukh house in Nagpur : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी ईडीने टाकला छापासकाळी ८ वाजल्यापासून ईडीचे अधिकारी करतायत चौकशीअनिल देशमुख सध्या घरी नसल्याची माहिती समोर आली आहे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानापाठोपाठ आता मुंबईतील निवासस्थानी देखील सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला आहे. देशमुखांच्या दोन्ही निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली आहे. याच अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनिल देशमुख सध्या नागपूर आणि मुंबईतही नाहीत ते पुण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. ED raids former Home Minister Anil Deshmukh house in Nagpur.

अनिल देशमुख प्रकरण : ईडीने जप्त केली महत्त्वाची कागदपत्रे

मुंबईतील वरळी येथे सुखदा टॉवरमध्ये अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे. याठिकाणी ईडीचे पाच ते सहा अधिकारी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे अनिल देशमुखांच्या नागपूरातील घराबाहेर सकाळपासूच केंद्रीय पोलीस दलाचे सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गुरूवारी ईडीकडून पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची देखील याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज ईडीनं अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकला आहे. याआधी मे महिन्यात देखील अनिल देशमुखांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यात महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 

सीबीआयकडून ११ तास चौकशीकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय