शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

संजय राऊत प्रकरणात ईडीची पुन्हा छापेमारी; गुरू आशिष कन्स्ट्रक्शनची कागदपत्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 07:11 IST

एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळ पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीमध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संचालक होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या चौकशीच्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी गोरेगाव येथील गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी छापेमारी करीत काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. 

एकूण ४७ एकर जागेवर असलेल्या पत्राचाळ पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. या कंपनीमध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संचालक होते, तर याच कंपनीमध्ये राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांचीदेखील हिस्सेदारी होती. पुनर्विकासाच्या कामातून तेथील ६७२ रहिवाशांना घरे देणे आणि तीन हजार फ्लॅटस् म्हाडाला हस्तांतरित करणे अपेक्षित होते. मात्र, गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने येथे पुनर्विकासाचे काम न करता ती जागा आणि त्यावरील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यांची आठ बिल्डरांना विक्री केली. या विक्रीतून या कंपनीला १,०३९  कोटी ७९ लाख रुपये मिळाले. 

राऊत यांचा ‘फ्रंट मॅन’याप्रकरणी सन २०१८ मध्ये म्हाडाने तक्रार केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत, वाधवान बंधू यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप ईडीने केला. संजय राऊत यांची ईडी कोठडी ४ ऑगस्टपर्यंत आहे. मात्र, त्यांच्या चौकशीतून जी माहिती पुढे येत आहे, त्या अनुषंगाने अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय