शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ED at Sanjay Raut Residence: "...मोठी कारवाई करायचीय"; एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया टाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 12:01 IST

Eknath Shinde on ED at Sanjay Raut Residence: एकनाथ शिंदे रात्री उशिराने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

संजय राऊत यांना ईडी कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकते. एकीकडे राऊतांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांवरील ईडी कारवाई थांबल्याचा आरोप केलेला असताना राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडी दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. 

एकनाथ शिंदे रात्री उशिराने दिल्लीहून औरंगाबादला आले आहेत. आज ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांना मुंबईतील संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी इथे विकासकामांची मोठी कारवाई करायचीय असे उत्तर देत राऊतांवरील प्रतिक्रिया टाळली आहे. 

दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनी राऊतांवरील कारवाई ही आनंदाची बातमी असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे. “ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही,” असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट म्हणाले.

औरंगाबाद दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी औरंगाबादेत मुक्कामी येणार होते. मात्र अचानक या दौऱ्यात बदल झाला आणि ते शनिवारी रात्री औरंगाबादहुन दिल्लीला गेले. रात्री उशिरा २ वाजेपर्यंत ते पुन्हा औरंगाबादमध्ये परत येतील , असे नियोजन विमानतळाला प्राप्त झाले होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचे विमान दिल्लीहून औरंगाबादेत दाखल झाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय