शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ईडी आणि आयबी भाजपचे दोन बलाढ्य कार्यकर्ते : राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 19:19 IST

सध्या भाजप मध्ये सुरू असलेली मेगा भरती ही या बलाढ्य कार्यकर्त्यांमुळेच सुरू आहे. 

ठळक मुद्देस्वाभिमानी संघटना काढणार सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश यात्रा

पुणे :  नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे ईडी आणि आयबी नावाचे दोन बलाढ्य कार्यकर्ते आहेत. ते इतर पक्षातील नेत्यांना भेटून त्यांना समजावून सांगतात की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कुठल्या पक्षात गेलं पाहिजे, नाही गेलं तर काय होईल या सर्व गोष्टींची त्या नेत्यांना कल्पना देऊन त्यांच्यासाठी कुठला पक्ष सोयीस्कर आहेत हे सांगतात. सध्या भाजप मध्ये सुरू असलेली मेगा भरती ही या बलाढ्य कार्यकर्त्यांमुळेच सुरू आहे. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

शेट्टी म्हणाले,ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत किंवा ज्या नेत्यांना विविध आरोपांखाली चौकशीची भीती आहेत तेच लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहे.  मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशावर ठाम भूमिका घेत आरोप असलेल्यांची  चौकशी पक्षप्रवेशानंतर देखील निःपक्षपातीपणे केली जाईल. 

आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढत आहेत. बांधकाम मजुरांचे मृत्यू, पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, धनगर आरक्षण, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान अशा अकरा प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शहाGovernmentसरकारRaju Shettyराजू शेट्टी