या पालेभाज्या खा आणि निरोगी रहा...!

By Admin | Updated: July 30, 2016 12:52 IST2016-07-30T12:48:41+5:302016-07-30T12:52:29+5:30

पालेभाज्या खाल्याने अंगात शक्ती तर येतेच पण आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते

Eat these vegetables and stay healthy ...! | या पालेभाज्या खा आणि निरोगी रहा...!

या पालेभाज्या खा आणि निरोगी रहा...!

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३०- थोडासा पालक खाऊन मिळालेल्या शक्तीने ब्लुटो सारख्या आडदांड व्यक्तीला ठोसे लगावून नामोहरम करणारा "पॉपॉय'चे कार्टून आपल्या सर्वांना आठवत असेलच..! पालेभाज्या खाल्याने अंगात शक्ती तर येतेच पण आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे लहानपणापासूनच आई आपल्याला सर्व पालेभाज्या खाण्यास सांगत असते. 
आज आम्हीही तुम्हाला विविध पालेभाज्या आणि त्याचे प्रकृतीला होणारे फायदे सांगणार आहोत...
 
> पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. 
> माठ  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. 
> चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. 
> हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.  
>  अळू  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. 
>  अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. 
>  घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. 
>  टाकळा :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. 
>  मायाळू :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. 
>  तांदुळजा :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. 
>  मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. 
> शेपू ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. 
> शेवगा ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. 
 > कोथिंबीर :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
> कढीलिंब ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. 
 

Web Title: Eat these vegetables and stay healthy ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.