शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार क्षेत्रात जिओमुळे भूकंप!

By admin | Updated: September 2, 2016 01:25 IST

रिलायन्स जिओने दूर संचार क्षेत्रात धमाकेदार एंट्री केल्यामुळे विद्यमान दूरसंचार कंपन्यांचे समभाग गडगडले. भारती एअरटेल, आयडिया या कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे मुंबई शेअर

मुंबई : रिलायन्स जिओने दूर संचार क्षेत्रात धमाकेदार एंट्री केल्यामुळे विद्यमान दूरसंचार कंपन्यांचे समभाग गडगडले. भारती एअरटेल, आयडिया या कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांच्यात घसरण झाली. खरे म्हणजे सकाळी सेन्सेक्स तेजीसह उघडला होता. तथापि, रिलायन्स जिओची घोषणा होताच तो घसरला. सत्राच्या अखेरीस २८.६९ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,४२३.४८ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ११.५५ अंकांनी घसरून ८,७७४.६५ टक्क्यांनी घसरला.रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओची घोषणा केल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात भूकंपच झाला. सर्व विद्यमान दूरसंचार कंपन्यांचे समभाग आपटले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या भारती एअरटेलचा समभाग ६.३७ टक्क्यांनी घसरून ३१0.७0 रुपयांवर आला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांत एअरटेलची घसरण सर्वांत जास्त ठरली. आयडीया सेल्यूलरचा समभाग १0.४८ टक्क्यांनी घसरून ८३.७0 रुपयांवर आला. हा ५२ आठवड्यांचा नीचांक ठरला आहे. सेन्सेक्समधील ३0 पैकी १३ कंपन्यांचे समभाग घसरले. १६ कंपन्यांचे समभाग वाढले. अदाणी पोर्ट्स, विप्रो, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, एलअँडटी, एनटीपीसी आणि एशियन पेंट्स, अंबुजा सिमेंट, जयप्रकाश असोसिएट्स, यांचे समभाग घसरले. (प्रतिनिधी)एअरटेल, आयडिया, रिलायन्सचे मूल्य घटलेसमभाग घसरल्यामुळे भारती एअरटेल आणि आयडीयाला २३,९८३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. भारती एअरटेलचे बाजार मूल्य तब्बल १२ हजार कोटींनी घसरले आहे. आयडियाचे बाजारमूल्यही २,८00 कोटींनी खाली आले आहे. भारतातील चौथी मोठी कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे बाजार मूल्य ५0.४0 कोटींनी घसरले आहे. विशेष म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीची आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभागही २.७३ टक्क्यांनी घसरून १,0२९.१५ टक्क्यांवर आला. सेन्सेक्समधील दुसऱ्या क्रमांकाची घसरण रिलायन्सचीच.