सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यावेळी मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरची विशिष्ट रचना केली आहे. वरच्या बाजूस पांढऱ्या रंगात गटांतील उमेदवारांची नावे असतील. त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगात गणातील उमेदवारांची नावे असणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ होणार आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठी दि. ७ रोजी मतदान होत आहे. यावेळी वृद्ध ग्रामस्थ, महिला मतदान करत असतात. यावेळी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी एकच मतदान यंत्र असल्यामुळे त्यांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे मतदान यंत्राच्या बॅलेट पेपरवर दोन वेगवेगळ्या रंग वापरले आहेत.
गटांच्या उमेदवारांसाठी बॅलेट पेपरचा वरचा भाग पांढऱ्या रंगाचा आहे. त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगाच्या बॅलेट पेपरवर पंचायत समिती गणातील उमेदवारांची नावे असणार आहेत. त्यामुळे मतदारांना योग्य ठिकाणी मतदान करणे सोपे जाणार आहे.
उमेदवार जास्त असल्यास दोन यंत्रेएका मतपत्रिकेवर पंधरा उमेदवार आणि नोटा असे सोळा पर्याय असतात. त्यापेक्षा जास्त नाव असल्यास दोन मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमार्फत मतदारांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दि. ७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे गट आणि गणासाठी निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा. - आशिष बारकुल, प्रांताधिकारी, सातारा
Web Summary : For the ZP election, voters will see white for 'Gat' candidates and pink for 'Gan' candidates on ballot papers. This color-coding aims to simplify voting. Two machines will be used if there are more than fifteen candidates. Polling is from 7:30 AM to 5:30 PM.
Web Summary : ZP चुनाव में, मतदाताओं को मतपत्रों पर 'गट' उम्मीदवारों के लिए सफेद और 'गण' उम्मीदवारों के लिए गुलाबी रंग दिखाई देगा। यह रंग-कोडिंग मतदान को सरल बनाने के उद्देश्य से है। पंद्रह से अधिक उम्मीदवार होने पर दो मशीनों का उपयोग किया जाएगा। मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक है।