दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:53 PM2022-08-09T12:53:24+5:302022-08-09T12:58:58+5:30

या व्हिडिओ कॉलवर प्रत्यक्ष राज ठाकरे आहेत हे बघून महाराष्ट्र सैनिकांच्या जल्लोषाला एकच उधाण आले

During the tour, Amit Thackeray's mobile suddenly received a video call from MNS Raj Thackeray | दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

Next

मालेगाव - सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाची नवी पिढी बरीच चर्चेत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात शिवसंवाद, निष्ठा यात्रा काढली आहे. तर दुसरे अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मुंबई, कोकणपासून सुरू झालेला हा दौरा आता उत्तर महाराष्ट्रात पोहचला आहे. 

सोमवारी अमित ठाकरे हे मालेगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अमित ठाकरेंचे जंगी स्वागत करण्यात आले. अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. तेव्हा अचानक अमित ठाकरेंच्या मोबाईलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांचा व्हिडिओ कॉल आला. मनसेच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे मालेगावमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी अभूतपूर्व स्वागत केले. योगायोगाने त्याच वेळी राज ठाकरे यांचा अमित यांना मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. तेव्हा अमित ठाकरेंनी तिथे जमलेल्या महाराष्ट्र सैनिकांची राज ठाकरेंशी अनोख्या पद्धतीने भेट घडवून आणली. या व्हिडिओत राज ठाकरेंना पाहून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत हिंदूजननायक म्हणून राज ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या. 

या व्हिडिओ कॉलवर प्रत्यक्ष राज ठाकरे आहेत हे बघून महाराष्ट्र सैनिकांच्या जल्लोषाला एकच उधाण आले. अनपेक्षितपणे आपल्या विठ्ठलाचं 'व्हिडिओ-दर्शन' झाल्यामुळे अनेकजण अक्षरशः शहारून गेले आणि मग सर्वांनीच "हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो" आदी घोषणा देत मालेगाव दणाणून सोडले असं मनसेच्या ट्विटरमध्ये सांगण्यात आले. 

झोपी गेलेला जागा झाला..!, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबईतील ३० महाविद्यालयांत मनविसे युनिट उदघाटन झाल्यानंतर- शिवसैनिकांच्या निष्ठा तपासण्यासाठी रक्त तपासणी करणारे- pathologist आदित्य ठाकरे जागे झाले आहेत. पश्चिम उपनगरातील पाटकर किंवा निर्मल, गोखले महाविद्यालयांत आता शिवसेनेचा, युवासेनेचा बोर्ड लावून काहीही फायदा होणार नाही, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं. या महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनं अमितसाहेबांनी कधीच जिंकली आहेत", असं मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगत आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. 

Web Title: During the tour, Amit Thackeray's mobile suddenly received a video call from MNS Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.