पुणे-मुुंबई प्रवासादरम्यान चार लाखांचे दागिने लंपास

By Admin | Updated: February 15, 2016 03:51 IST2016-02-15T03:51:51+5:302016-02-15T03:51:51+5:30

राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या हिरकणी बसमधून पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुटकेसमधून चार लाख ३६ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीला जाण्याचा प्रकार अलीकडेच घडला.

During the Pune-Mumbai journey, four lakh jewelery lamps | पुणे-मुुंबई प्रवासादरम्यान चार लाखांचे दागिने लंपास

पुणे-मुुंबई प्रवासादरम्यान चार लाखांचे दागिने लंपास

ठाणे : राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या हिरकणी बसमधून पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुटकेसमधून चार लाख ३६ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीला जाण्याचा प्रकार अलीकडेच घडला. याप्रकरणी या दाम्पत्याने पुणे शहर आयुक्तालयातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ती आता नौपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
नौपाड्याच्या हरिनिवास सर्कलजवळील ठाणावाला चाळीत राहणारे ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सपत्नीक ठाण्याकडे येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकातून २५ जानेवारी २०१६ रोजी एसटीमध्ये बसले. त्यांनी नंबर लॉक असलेल्या बॅगेत दागिन्यांसह त्यांचे इतर सामान ठेवले होते. दुपारी २.४५ ते सायंकाळी
७.३० वा.दरम्यान एका भामट्याने त्यांच्या बॅगेच्या लॉकचा क्रमांक जुळवून बॅगेतील ६२ हजार ५०० रुपयांची सोनसाखळी, एक लाख १२ हजारांचे नेकलेस आणि कानातील टॉप्स (वजन साडेचार तोळे), सहा तोळ्यांच्या एक लाख ६२ हजारांच्या दोन पाटल्या आणि एक लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज लंपास केला.
सर्वत्र शोधाशोध करूनही आपल्या सुटकेसमधील दागिने न सापडल्यामुळे त्यांनी अखेर स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली. हा गुन्हा आता स्वारगेट पोलिसांनी नौपाडा पोलिसांकडे वर्ग केला असून सहायक पोलीस निरीक्षक निर्मला पाटील या अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: During the Pune-Mumbai journey, four lakh jewelery lamps