गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लिल हावभाव करणार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:47 IST2017-09-01T21:42:14+5:302017-09-01T21:47:50+5:30
गौरी-गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्यास अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गणेश मंडळ्याच्या कार्यकर्त्याला विरार पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. हर्षद कदम असे त्याचे नाव आहे.

गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लिल हावभाव करणार अटकेत
वसई, दि. 1 - गौरी-गणपती विसर्जनवेळी महिला पोलीस अधिकाऱ्यास अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका गणेश मंडळ्याच्या कार्यकर्त्याला विरार पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. हर्षद कदम असे त्याचे नाव आहे.
गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास विरार पश्चिम डोंगरपाडा तलावावर विसर्जनवेळी ही घटना घडली. मंडळाचा बेंजो बंद करा असे सांगत असताना हर्षद कदमने महिला पोलीस अधिकाऱ्याकडे पाहून अश्लील हावभाव केले होते. विरार पश्चिम कडील नवतरुण मित्र मंडळ आणि श्री महागणपती मित्र मंडळ च्या गणपती विसर्जन वेळी ही घटना घडली.
विरार पोलीस ठाण्यात सरकारी काम करीत असताना अश्लील हावभाव करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हर्षद कदमला अटक करण्यात आली आहे.