पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना –भाजपा कार्यकर्ते आपसात भिडले

By Admin | Updated: August 27, 2016 18:15 IST2016-08-27T18:15:21+5:302016-08-27T18:15:21+5:30

महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा प्रचारा दरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन नंतर त्याचे रुपांतर मारहाणीत झाले

During the election campaign by the by-election, Shiv Sena-BJP workers came together | पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना –भाजपा कार्यकर्ते आपसात भिडले

पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना –भाजपा कार्यकर्ते आपसात भिडले

>- ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा प्रचारा दरम्यान शनिवारी (दि.27) दुपारी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन नंतर त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.
दुपारी अडीचच्या सुमारास प्रभाग क्रमांक ३५, जेलरोड परिसरात ही घटना घडली. यात एक कार्यकर्ता जखमी झाल्याचे समजते. दरम्यान् घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्याने राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोबारा केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी संचलन केले आहे. दुपारी काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नव्यांनेच पक्षांतर केलेल्या एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्यानी या राड्याला सर्वप्रथम सुरुवात केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
 

Web Title: During the election campaign by the by-election, Shiv Sena-BJP workers came together