शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:29 AM

नवी मुंबईतील मेट्रो व आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी प्रकल्पांच्या ५0 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या १६ निविदांच्या जाहिराती राष्ट्रीय अग्रगण्य वर्तमानपत्रात दिल्या नाहीत आणि ८९0 कोटी किमतीची कामे सहा ठेकेदारांना अनुभव नसताना दिली, असेही कॅगने म्हटले आहे.

मुंबई : भाजप सरकारच्या काळातील २0१८ मधील कामांबाबत कॅगचा अहवाल आला असून त्यात सुमारे २ हजार कोटींच्या कामात अनियमितता असल्याचा ठपका नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठेवला आहे. सिडकोच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नवी मुंबईतील मेट्रो व आंतरराष्ट्रीय विमानतळ आदी प्रकल्पांच्या ५0 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या १६ निविदांच्या जाहिराती राष्ट्रीय अग्रगण्य वर्तमानपत्रात दिल्या नाहीत आणि ८९0 कोटी किमतीची कामे सहा ठेकेदारांना अनुभव नसताना दिली, असेही कॅगने म्हटले आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अहवाल विधानसभेत सादर केला.कॅगच्या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील कामांच्या अनियमिततेवर ठपका आहे. ४२९.८९ कोटी रुपयांच्या १0 कामांत निविदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले. तसेच ६९.३८ कोटी रुपयांची अतिरिक्त कामे निविदेविना दिली गेली, तसेच ७0 कोटींची अतिरिक्त कामे निविदा न मागवता दिली, १५ कोटींपेक्षा जास्त किमतीची सात कामे देताना तांत्रिक मूल्यांकनाचा गोंधळ आहे.नवी मुंबई विमानतळ कामात टेकडी कापण्यासाठी २0३३ कोटी दिले, मात्र त्याच टेकडीतून निघालेल्या दगडांचा वापर भरणीसाठी केल्याचे भासवून त्यावर २२.0८ कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवले. कामाच्या विलंबासाठी कंत्राटदारांकडून १८६ कोटी वसूल करायचे होते. मात्र, सिडकोने ते केले नाहीत. तसेच १,३२८ कोटी रुपयांच्या एका कामात नियमांचे उल्लंघन करून २५.३३ कोटी रुपये अतिरिक्त सुसज्जता अग्रीम दिले गेले, असेही कॅगने म्हटले आहे.>अहवालातील प्रकल्प २०१४ पूर्वीचे - फडणवीससिडको संदर्भातील कॅगच्या अहवालात उल्लेख असलेले प्रकल्प हे २०१४ पूर्वीचे म्हणजे आघाडी सरकारच्या काळातील आहेत. त्यामुळे केवळ नेमका भाग का वगळला म्हणजे ‘सिलेक्टिव्ह लिकेज’ का केले गेले, याचे आश्चर्य वाटते. शिवाय, याआधीचा ‘स्वप्नपूर्ती’ संदर्भातील महत्त्वाचा भाग वगळला का गेला याचीही मला उत्कंठा आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ंवस्तुनिष्ठ नियोजन सुलभ होण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांची व भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची आकडेवारी देखील सिडकोने ठेवली नव्हती, असेही कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस