नागपुरात दुहेरी हत्याकांड

By Admin | Updated: November 19, 2015 01:57 IST2015-11-19T01:57:36+5:302015-11-19T01:57:36+5:30

दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरात मंगळवारी रात्री हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी

Duplicate massacre in Nagpur | नागपुरात दुहेरी हत्याकांड

नागपुरात दुहेरी हत्याकांड

नागपूर : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दुहेरी हत्याकांडात झाले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थ नगरात मंगळवारी रात्री हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज भारद्वाज याला अटक केली आहे.
बुधवारी सकाळी इंद्रप्रस्थ नगरातील रेल्वेलाईन डम्पिंग यार्डजवळ दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. दोन्ही तरुणांची दगडाने तसेच सिमेंटच्या फळीने ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी गर्दीतील लोकांना मृतांबाबत विचारणा केली असता ते बंटी ऊर्फ संदीप शरद आटे आणि रवी प्रकाश टुले यांचे मृतदेह असल्याचे कळले.

तासाभरातच झाला उलगडा
मंगळवारी रात्री घटनास्थळाजवळ बंटी आणि रवीसोबत मोहन भारद्वाज दारू पीत बसला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मोहनचे घर गाठून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने या हत्याकांडाची कबुली दिली.

Web Title: Duplicate massacre in Nagpur