शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:40 IST

Nana Patole News: सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले - सेवक वाघाये

लोकसभा निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे महाआघाडी असो की महायुती दोघांनाही काही जागांवरून अद्याप निर्णय घेता आलेले नाहीत. यामुळे एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करण्याचे काम सुरुच आहे. माध्यमांत नाराजी व्यक्त करून झाल्यावर एकत्र बसून चर्चाही सुरु आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराने पैसे घेऊन डमी उमेदवार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचा नातेसंबंधातील उमेदवार असलेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंनी डमी उमेदवार दिल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी आपल्या आमदारकीची डील केल्याचाही आरोप वाघाये यांनी केला आहे. 

महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे हे पटोलेंचे नातेवाईक आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पटोले यांनी डमी उमेदवार दिला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या डॉ. प्रशांत पडोळे यांना २००० मते पडली होती. त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याने कधी पंजा हातात घेतला नाही, कधी काँग्रेसचा प्रचार केला नाही की झेंडा हातात घेतला नाही. पटोले यांनी भंडारा आणि गडचिरोलीचे तिकीट विकल्याचा आरोप वाघाये यांनी केला आहे. 

तसेच भंडाऱ्याच्या व्यक्तीला पटोलेंनी गडचिरोलीची उमेदवारी दिली आहे. सुधाकर गणगणेंना पाडल्यामुळे विलासराव देशमुखांनी नाना पटोले यांना पक्षातून काढले होते. १० वर्षांनी ते परत काँग्रेसमध्ये आले आणि राहुल गांधी, सोनिया गांधींना फारशी माहिती नसल्याने त्याचा फायदा ते घेत आहेत. आम्ही पक्ष उभा केला, नानांमुळे पक्ष संपायला लागला आहे, असा आरोप वाघाये यांनी केला आहे. वाघाये यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४