शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दुमदुमला जयघोष तुकाराम- तुकाराम नामाचा.. देहूनगरीत फुलला भक्तिमळा बीजोत्सवाचा..... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 12:29 IST

तुकाराम -तुकाराम असा आसमंत दणाणारा जयघोष..., माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षांवर झालेली बेल-लाह्या फुलांची झालेली उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष-लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला...  

ठळक मुद्देइंद्रायणी काठी बीजसोहळ्यासाठी लोटला भक्तीसागर, लाखो भाविकांची उपस्थिती :  राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखलहरिनामाच्या गजरात बरोबर बारा वाजून आठ मिनिटांनी नादुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टीखासदार श्रीरंग बारणे, तसेच पार्थ पवार उपस्थित

विश्वास मोरे /मंगेश पाडेश्री क्षेत्र देहूगाव : इंद्रायणीतीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम -तुकाराम असा आसमंत दणाणारा जयघोष..., माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षांवर झालेली बेल-लाह्या फुलांची झालेली उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष-लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला.  श्री संत तुकाराम महाराजांचा ३७१ वा बीजोत्सव सोहळयासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाविक देहूनगरीत दाखल झाले आहेत. भजन कीर्तन आणि प्रवचनाने देहूनगरी भक्तीमय झाली आहे. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर दिंडीकरी व फडकरी यांचे ठिकठिकाणी गाथा पारायण सुरू आहे. सोहळ्यासाठी श्री संत तुकाराममहाराज संस्थानासह ग्रामपंचायत प्रशासन व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले. कडकोड बंदोबस्त तैनात केला आहे. संस्थानाच्या वतीने पहाटे ३ ला काकड आरती, ४ वाजता श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते झाली. पहाटे सहाला श्री संत तुकाराम महाराज मंदिरातील महापूजा झाली. साडेदहाला देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले. माध्यान्ही सूर्य येताच वैकुंठगमन सोहळा प्रसंगावर देहूकर महाराजांचे कीर्तन सुरू होते. त्याचवेळी इंद्रायणीतीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम -तुकाराम असा आसमंत दणाणारा जयघोष झाला. माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षांवर झालेली बेल-लाह्य फुलांची झालेली उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष-लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. त्यानंतर दुपारी साडेबाराला पालखी परत मुख्य मंदिरात आली. भाविकांच्या गदीर्ने इंद्रायणीतीर फुलून गेला होता. अपूर्व उत्साह जाणवत होता. रात्री व सकाळी पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम, मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर आणि जन्मस्थान मंदिर परिसरात होणार असल्याचे संस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले.

हरिनामाच्या गजरात बरोबर बारा वाजून आठ मिनिटांनी नादुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, तसेच पार्थ पवार यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, अपर तहसीलदार गीता गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव,  संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होतेक्षणचित्रे १) मंदिरात ३२ छुपे कॅमेरे,  पोलिसांसह सुमारे २०० स्वयंसेवक. २) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पुरेसा पाणीपुरवठा ३)  प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने गाथा मंदिर, मुख्य मंदिर४) वैकुंठगमन मंदिर परिसरात बाह्यरुग्ण विभाग सुरू.५) आरोग्य सहायक, परिचारिका, आरोग्यसेवक आणि चार वैद्यकीय अधिकारी, ४ रुग्णवाहिका, एक कार्डियाक रुग्णवाहिका.

टॅग्स :dehuदेहूsant tukaramसंत तुकाराम