शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' आंदोलनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपली; लोढेंनी मलिकांना लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 12:23 IST

कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी इतर नेत्यांच्या अथवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे असं राष्ट्रवादीनं म्हटलं.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोन दिवसांपासून भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. त्यात सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीने उडी घेतली. नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन चुकीचे असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने दिवसा अखेरीस राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी टोलेबाजी सुरू झाली.

कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी इतर नेत्यांच्या अथवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे आंदोलने करणे योग्य नाही. नेत्यांची घरे किंवा कार्यालयांबाहेर आंदोलनाचे अलीकडे सुरू झालेले प्रकार चुकीचे आहेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे पोलीस प्रशासनावर विनाकारण ताण येतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. 

हे तेव्हा का नाही  सुचले - अतुल लोंढे ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषा भाजप नेत्यांनी वापरली, मारहाणीची धमकी दिली त्याबद्दल नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली असती तर जास्त सयुक्तिक झाले असते. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि त्यावर भाजप नेत्यांचे मौन याचा निषेध करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मुळात नेत्यांची घरे किंवा पक्ष कार्यालयावर आंदोलने नेण्याची प्रथा भाजपने सुरू केली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न झाला होता. भाजपने काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यावेळी नवाब मलिक यांनी विरोध केला असता, टीका केली असती तर बरे झाले असते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस