शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 07:10 IST

थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली.

- सचिन कापसे लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने अतिशय आक्रमकतेने पुण्यात काम करत लोकसभेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा फोकस जानेवारीपासूनच पुण्यावर होता. त्यामुळे भाजपने तगडा मराठा उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली. त्यानंतर अंतर्गत गटबाजीच्या चर्चाही काही काळ रंगल्या. हेच काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही घडले. कसब्याच्या विजयानंतर चर्चेत आलेल्या रवींद्र धंगेकरांना महाआघाडीने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर  झाल्यानंतर लगेच पक्षांतर्गत कलह समोर आला. 

थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतर्गत गटबाजी आणि मतांच्या ध्रुवीकरणामुळे अटीतटीची होणार आहे. सामना कोण जिंकणार हे निकालानंतरच स्पष्ट हो.

अंतर्गत कलहामुळे वाढणार डोकेदुखीnपुणे लोकसभा क्षेत्रातील ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. १ आमदार अजित पवार गटाचे तर १ काँग्रेसचे आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर भाजपाला वरवर फायदा दिसत असला तरी अंतर्गत कलहाची मुळे मोठ्या पदाधिकाऱ्यांपासून तर  नगरसेवकांपर्यंत पसरलेली आहेत. nकाँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काही पदाधिकारी नाराज झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी तर आपली नाराजी जाहीर व्यक्त करत काही दिवस प्रचारापासूनही ते दूर राहिले होते. वरिष्ठांनी समजून काढल्यानंतर आता ते प्रचारात दिसत आहेत. 

सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न nतगडा मराठा उमेदवार देत भाजपने सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देत काँग्रेसने ओबीसींना जवळ घेण्याचा प्रयत्न केला. थेट दुरंगी लढत होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला रिंगणात उतरवण्यात आले. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देवाहतूक कोंडी हा पुणेकरांचा कळीचा मुद्दा आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही तास वाया जातात.  पिण्याच्या पाण्यासाठी अनेक उपनगरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. टँकरच्या आतील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असते.   वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी रस्त्यांची कामे तसेच ब्रिज आणि मेट्रोच्या विस्ताराची गरज आहे. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. 

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के२०१४    अनिल शिरोळे    भाजप    ५,६९,८२५    ३१.०४२००९    सुरेश कलमाडी    काँग्रेस    २,७९,९७३    १५.४९२००४    सुरेश कलमाडी    काँग्रेस    ३,७३,७७४    ४८.००१९९९    प्रदीप रावत    भाजप    ३,०४,९५५    ४१.६२१९९८    विठ्ठल तुपे    काँग्रेस    ४,३४,९१५    ५२.७९

टॅग्स :pune-pcपुणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vasant Moreवसंत मोरेmurlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकर