चार गुण कमी मिळाल्याने तिने मृत्यूला कवटाळले
By Admin | Updated: May 30, 2017 23:52 IST2017-05-30T23:52:12+5:302017-05-30T23:52:12+5:30
इयत्ता १२ विच्या परीक्षेत चार कमी मिळाल्यामुळे एका तरुणीने प्रकाशनगर येथे रेल्वे पटरीवर जाऊन रेल्वे खाली येत मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली

चार गुण कमी मिळाल्याने तिने मृत्यूला कवटाळले
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 30 - इयत्ता १२ विच्या परीक्षेत चार कमी मिळाल्यामुळे एका तरुणीने प्रकाशनगर येथे रेल्वे पटरीवर जाऊन रेल्वे खाली येत मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रकाशनगर मध्ये घडली. मनीषा भाऊसाहेब गायकवाड असे तरुणीचे नाव आहे. आज दुपारी १ वाजता इयत्ता बारावीचा निकाल होता. मनीषा सुद्धा १२ वी इयत्तेत शिकत होती. तिला १२ वी इयत्तेत फक्त ४ मार्क कमी पडल्याने ती दुपारपासूनच खूप नाराज होती. नंतर तिने मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घराच्या बाहेर पडून घरापासून १०० मीटर वर असलेल्या रेल्वे पटरीवर जाऊन हैद्राबाद पॅसेंजर समोर येत आत्महत्या केली.
हा प्रकार रेल्वे पटरीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनात आला, त्या व्यक्तीने तात्काळ घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी धाव घेत मृतदेहास शवविच्छदानासाठी घाटी रुग्णालयात आणून घटनेची नोंद केली.