ध क्का दा य क... शाळेत डेंग्यू डासांच्या अळ्या

By Admin | Updated: September 3, 2014 01:36 IST2014-09-03T01:36:30+5:302014-09-03T01:36:30+5:30

शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील

Due to the fact that dengue lymph in the school dengue | ध क्का दा य क... शाळेत डेंग्यू डासांच्या अळ्या

ध क्का दा य क... शाळेत डेंग्यू डासांच्या अळ्या

महापालिकेच्या चमूने केली पाहणी : कुठे फवारणी तर कुठे सफाई
नागपूर : शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील सीडीएस शाळेतील बंद असलेल्या कारंजामध्ये तर दाभा रोडवरील सांदीपनी शाळेत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात चामडोक मिळाल्या. विभागाच्या चमूने तत्काळ कारवाई करीत त्या नष्ट केल्या आणि खबरदारी म्हणून फवारणीही केली. ‘लोकमत’ च्या वृत्तामुळे आणि महापालिकेच्या तत्परतेमुळे या दोन शाळेत डेंग्यूच्या डासांवर प्रतिबंध घालण्यास यश मिळाले.
डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली आहे. याला सर्वात जास्त विद्यार्थी बळी पडत आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी इस्पितळात या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत आहे. डेंग्यूचे डास दिवसा चावत असल्याने आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहात असल्याने ‘लोकमत’ने सोमवारी दहा शाळांचे सर्वेक्षण केले. ‘डेंग्यूचे विघ्न’ या मथळ्याखाली शाळांमध्ये डासांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना होतच नसल्याचे धक्कादायक वास्तव मांडले. या वृत्ताची दखल महापालिकेने घेतली. ‘लोकमत’च्या चमूने सर्वेक्षण केलेल्या काही शाळांमध्ये मनपाच्या चमूने पोहचून पाहणी केली.
हनुमानगर झोननेही घेतली दखल
मनपाच्या हनुमाननगर झोन क्रमांक ३ च्या आरोग्य विभागानेही या वृत्ताची दखल घेतली. झोनल अधिकारी डी.एम. कलोडे यांनी स्वत:हून दुर्गानगर येथील महापालिकेच्या शाळेची पाहणी केली. येथील स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून कीटकनाशकाची फवारणी करून घेतली. सोबतच राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. विद्यालयाच्या सायकल स्टॅण्डच्या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचा ढीगही उचलण्याचे निर्देश दिले. दुपारनंतर हा संपूर्ण परिसर चकाचक झाला होता.
सीडीएस व सांदीपनी
शाळेत डेंग्यूचे डास
सीडीएस व सांदीपनी शाळेत डेंग्यूचे डास असल्याचे मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाच्या अधिकारी डॉ. जयश्री ठोटे यांनी सांगितले, मंगळवारी केलेल्या पाहणीत ‘सीडीएस’ आणि ‘सांदीपनी’ या शाळांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्याने धक्काच बसला. सीडीएस शाळेत बंद असलेल्या कारंजाच्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासाच्या अळ्या आढळून आल्या. तसेच शाळा प्रशासनाला पाणी कुठे साचू देऊ नका, अशा सूचनाही दिल्या. सांदीपनी शाळेत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या. शाळा प्रशासनाला याची जाणीव करून देत ते नष्ट करण्यात आले.

Web Title: Due to the fact that dengue lymph in the school dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.