पाण्याच्या आगारालाही दुष्काळाची धग
By Admin | Updated: July 10, 2014 01:55 IST2014-07-10T01:55:49+5:302014-07-10T01:55:49+5:30
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणो, सोलापूर आणि नगर या तीन जिलंचे पाण्याचे आगार म्हणून पुणो जिलची ओळख आहे.

पाण्याच्या आगारालाही दुष्काळाची धग
विजय बाविस्कर - पुणो
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणो, सोलापूर आणि नगर या तीन जिलंचे पाण्याचे आगार म्हणून पुणो जिलची ओळख आहे. घाटमाथ्यावर पडणा:या प्रचंड पावसामुळे या सगळ्या भागाची वर्षभराची बेगमी या चार महिन्यांतच होते. मात्र, हंगाम सुरू होऊन तब्बल महिना उलटला तरी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याच्या या आगाराला दुष्काळाची धग बसली आहे. पुणो शहर आणि जिलबरोबरच सोलापूर शहर आणि जिल्हा, नगर जिलतील करमाळा, श्रीगोंदा, बारामती, फलटण, माळशिरस, सांगोला या भागाला त्याची झळ बसणार आहे.
पुणो जिलमध्ये 3क् धरणो आहे. खडकवासला प्रणाली, कुकडी प्रणाली आणि भाटघर या तीन प्रणालींतून या सगळ्या भागाला पाणीपुरवठा होतो. 2क्क् टीएमसीहून अधिक पाणी या तीन प्रणालींतून साठविले जाते. यंदाच्या वर्षी मात्र ऐन पावसाळ्यातही 1क् टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. महाराष्ट्राच्या समृद्धतेचे प्रतिक असलेल्या उजनी धरणाने तर शुन्याच्या खालची पातळी गाठली असून अक्षरश: खरवडून पाणी काढावे लागत आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रणालीचीही हीच स्थिती आहे. केवळ दीड टीएमसी पाणी शिल्लक असून ते पुणो शहरालाच महिनाभरापेक्षा जास्त पुरणार नाही. गेल्या 25 वर्षाचा इतिहास पाहिला तर धरणांच्या परिसरात पावसाने इतका मोठा काळ दडी मारली असे दिसत नाही.
पुणो जिलत जून महिन्यात सरासरी 176 मिलीमीटर पाऊस पडतो. जुलैचा एक आठवडा उलटून गेला तरी तो 46 मिलीमीटर इतकाच आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच धरणभागातही पाऊस पडला नाही. त्यामुळे सोलापुरातील माळशिरस- सांगोल्यापासून ते श्रीगोंदा- करमाळ्यार्पयतच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणो, नगर आणि सोलापूर जिलतील साखर कारखानदारीला याचा मोठा फटका बसणार आहे. या भागांत तब्बल 45 साखर कारखाने आहेत. कालवा बागायतीवरील ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दौंड, बारामतीतील ऊस आताच वाळून चालला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार असून पुढच्या वर्षी या सर्व भागांतील साखर कारखान्यांवर संकट येणार आहे.
उत्तर पुणो जिलत मुख्य पिक भात हेच आहे. जिल्हय़ात भाताचे 6क् हजार हेक्टर क्षेत्र आहे. 6 हजार हेक्टर क्षेत्रवर रोपवाटिका असणो आवश्यक असते. जूनपूर्वीच्या रिमङिाम पावसाच्या भरवशावर शेतक:यांनी भाताच्या धूळवाफेवरच्या पेरण्या केल्या होत्या. आवश्यक क्षेत्रपैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रवर रोपवाटिका तयार झाल्या होत्या. मात्र, पावसाने दडी मारल्याने या रोपवाटिका जगवायच्या कशा हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या आठवडय़ाभरात पाऊस पडला नाही तर भाताचे संपूर्ण पिक वाया जाण्याची भीती आहे.
1पुणो जिलत खरीपाचे सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक हेक्टर क्षेत्रवरही पेरणी झालेली नाही. ऊस, भात या पिकांच्या नुकसानाबरोबरच जनावरांच्या चा:याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कडवळ, मकासारखी चारापिके घेण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. ज्वारीच्या पेरण्याही रखडल्या असल्याने वैरण मिळू शकणार नाही.
2सर्वात भीषण प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले आहे. मात्र, मुळात धरणांतच पुण्याची केवळ महिन्याची गरज कशीबशी भागेल इतके पाणी आहे. याशिवाय शेकडो गावांच्या पाणीयोजना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याला पाणी सोडणोच शक्य नाही, त्यामुळे या योजना बंद पडणार आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास रोज दोन तासच पाणी किंवा दिवसाआड पाणीपुरवठय़ाशिवाय पर्याय नाही. पुण्याच्या इतिहासात हे प्रथमच घडणार आहे.
3उजनी धरणावरही सोलापूरसह अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहेत. उजनीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास वरच्या भागातील धरणांतून पाणी सोडले जाते. मात्र, यंदा या धरणांतही पाणी नाही. ऐन पावसाळ्यात जिलतील तब्बल 13 लाख लोकसंख्येला टॅँकरने पाणी पुरवावे लागत आहे. भोर, मुळशीसारख्या अतिपावसाच्या भागात जेथे ऐरवी या काळात पुराचा प्रश्न निर्माण होतो, तेथे टॅँकर सुरू आहेत.