लोणावळ्यात गिधाड तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 5, 2016 15:05 IST2016-07-05T14:03:24+5:302016-07-05T15:05:55+5:30

लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिधाड तलाव परिसरात सोमवारी सकाळी फिरायला आलेल्या एका पर्यटकांचा तलावात बुडून मृत्यू झाला

Due to the death of the visitor in Lonaval, in the vulture tank | लोणावळ्यात गिधाड तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू

लोणावळ्यात गिधाड तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ५ -  लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिधाड तलाव परिसरात सोमवारी सकाळी फिरायला आलेल्या एका पर्यटकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. आज दुपारी १:३० वाजता सदर इसमाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू टिमला यश आले आहे. सोमवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.   
सिरिल थाँमस किनी (वय २२, रा. जुईरिया पार्क, मोरगाव, जे.आर. म्हात्रे रोड, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Web Title: Due to the death of the visitor in Lonaval, in the vulture tank