भोंदू बाबाच्या औषधामुळे १० वारक-यांच्या डोळ्याला गंभीर इजा

By Admin | Updated: July 14, 2016 16:46 IST2016-07-14T13:44:27+5:302016-07-14T16:46:23+5:30

एका भोंदू बाबाने डोळे स्वच्छ करतो असे सांगत आषाढीसाठी आलेल्या भाविकांच्या डोळ्यात औषध घातल्याने पंढरपूरमध्ये १० वारक-यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली

Due to Bhondu Baba's medicine, serious injury to the eyes of 10 people | भोंदू बाबाच्या औषधामुळे १० वारक-यांच्या डोळ्याला गंभीर इजा

भोंदू बाबाच्या औषधामुळे १० वारक-यांच्या डोळ्याला गंभीर इजा

>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १४ - एका भोंदू बाबाने डोळे स्वच्छ करतो असे सांगत आषाढीसाठी आलेल्या भाविकांच्या डोळ्यात औषध घातल्याने १० वारक-यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निमखेड (जि. बुलढाणा) येथील दिंडी भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील एका शेतामध्ये जेवणासाठी थांबली असताना महाराजाने डोळ्यात कचरा साचल्याचे सांगत औषध घातले. यामुळे त्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. नारायण मताजी ताटे (निमगाव, ता. सिंधखेड राजा, जि. बुलढाणा), शशिकला बाजीराव काळजोत (वय ६0, रा. किनगाव राजा, ता. सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), रामराव पांडुरंग गाडेकर (वय ५0, रा. धावरी, ता. लोहा, जि. नांदेड), यमुना गजानन सांगळे (वय ४५, जळगाव राजा, जि. बुलढाणा), रत्नमाला वामन मुंढे( वय ६0, नारायणगाव, ता. जळगावराजा, जि. बुलढाणा), द्रोपदी मारुती माटे (वय ६0, जळगावराजा, जि. बुलढाणा), विठाबाई ज्ञानदेव सुरडकर (वय ६५, रा. किनगावराजा, सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), शांताबाई कुंडलिक मुंढे ( वय ६५, रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा, बुलढाणा), मंगल नारायण शिंगणे (वय ५0, देऊळगावराजा, जि. बुलढाणा), संगीता विजय घिळे (वय ४0, किनगावराजा, ता सिंधखेडराजा, जि. बुलढाणा) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे एका महाराजाने डोळे स्वच्छ करतो म्हणून भाविकांच्या डोळ्यात औषध टाकले होते. त्या रुग्णांना अॅलर्जी झाली होती. ते ठीक होतील.
- डॉ. प्रशांत शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय
 

Web Title: Due to Bhondu Baba's medicine, serious injury to the eyes of 10 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.