धावत्या लोकलमधून ढकलल्याने मृत्यू

By Admin | Updated: January 15, 2015 05:35 IST2015-01-15T05:35:35+5:302015-01-15T05:35:35+5:30

धावत्या लोकलमधून एका प्रवाशाला ढकलल्याची घटना कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान सकाळी साडेदहा वाजता घडली.

Due to being driven from running locals death | धावत्या लोकलमधून ढकलल्याने मृत्यू

धावत्या लोकलमधून ढकलल्याने मृत्यू

मुंबई : धावत्या लोकलमधून एका प्रवाशाला ढकलल्याची घटना कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान सकाळी साडेदहा वाजता घडली. यात मुंब्रा येथे राहणारा कादर मोहम्मद इस्माईल शेख (१८) याचा मृत्यू झाला. यातील आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शेख हा जलद लोकलने सीएसटीच्या दिशेने जात होता. त्याचा मामाही सोबत होता. तो दरवाजाजवळ उभे राहून शेख प्रवास करत होता. कुर्ल्यात एका प्रवाशासोबत आत चढण्यावरून त्याचा वाद झाला आणि याच वादाच्या रागातून आरोपीने शेखला खाली ढकलून दिले.

Web Title: Due to being driven from running locals death