मद्यपी डॉक्टरचा रुग्णालयात धिंगाणा

By Admin | Updated: December 15, 2015 02:41 IST2015-12-15T02:41:20+5:302015-12-15T02:41:20+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणकुमार नागे यांनी शनिवारी रात्री ड्युटीवर असताना दारूच्या नशेत धिंगाणा घातला.

Drunk doctor drops in hospital | मद्यपी डॉक्टरचा रुग्णालयात धिंगाणा

मद्यपी डॉक्टरचा रुग्णालयात धिंगाणा

शिरपूर (जि. धुळे) : येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणकुमार नागे यांनी शनिवारी रात्री ड्युटीवर असताना दारूच्या नशेत धिंगाणा घातला.
डॉ. नागे यांच्याकडून स्पष्टीकरण घेतले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एन. वाघ यांनी ‘लोकमत’ला दिली. शनिवारी रात्री डॉ़ नागे हे मद्यपान करून बेधुंद अवस्थेत रुग्णालयात आले. रात्री १०च्या सुमारास आरडाओरड करणाऱ्या डॉ़ नागे यांना काही युवकांनी जाब विचारला असता, त्यांची शाद्बिक चकमक उडाली. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉ. नागे यांना एका खोलीत बंद केले आणि अन्य एका डॉक्टरला ड्युटीवर बोलविले. (प्रतिनिधी)

Web Title: Drunk doctor drops in hospital