डासांविरुद्ध वापरणार ड्रोन

By Admin | Updated: October 20, 2016 04:48 IST2016-10-20T04:48:51+5:302016-10-20T04:48:51+5:30

डासांविरुद्धच्या लढाईत ड्रोन (मानवरहित विमान) वापरण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.

Drones used against mosquitoes | डासांविरुद्ध वापरणार ड्रोन

डासांविरुद्ध वापरणार ड्रोन


अमरावती : डासांविरुद्धच्या लढाईत ड्रोन (मानवरहित विमान) वापरण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. गटारांच्या कोपऱ्यांवर डास प्रतिबंधक रसायन फवारण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात येणार आहे.
ड्रोनद्वारे मोठ्या परिसरात फवारणी करणे शक्य असल्यामुळे डासविरोधी लढाईत ते उपयुक्त ठरतील, असे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले. हा विभाग ड्रोनद्वारे धूरफवारणीच्या व्यवहार्यतेचाही अभ्यास करीत आहे. वेलागापुडी येथील राज्य सचिवालयात झालेल्या बैठकीत या मुद्यावर सखोल चर्चा झाली. आरोग्यमंत्री कामिनेनी श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सुरू झालेली आढावा बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Drones used against mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.