शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी ५०० कोटींचे ड्रोन घेणार - अनिल देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 20:46 IST

गृहमंत्री म्हणून प्रथमच गडचिरोलीच्या दौ-यावर आलेल्या देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे'तत्कालीन सरकारच्या विचारांविरूद्ध जाणा-यांना त्यांनी शहरी नक्षलवादी ठरवून अडकविण्याचा प्रयत्न केला. ''सेक्शन ६५ प्रमाणे एखाद्या घटनेचा तपास करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. ''नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना चांगले यश येत आहे.'

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना चांगले यश येत आहे. परंतू जंगलात लपून राहणा-या नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्याठी आणि अभियानादरम्यान त्यांच्या शोधमोहिमेसाठी ५०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक ड्रोन गृहविभागाकडून खरेदी केले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

गृहमंत्री म्हणून प्रथमच गडचिरोलीच्या दौ-यावर आलेल्या देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेच्या तपासात काही लोकांवर आकसपूर्ण कारवाई झाली. तत्कालीन सरकारच्या विचारांविरूद्ध जाणा-यांना त्यांनी शहरी नक्षलवादी ठरवून अडकविण्याचा प्रयत्न केला. 

या प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यात आला. त्यामुळे कायदेशिर मार्गदर्शन घेऊन या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) केला जाईल. सेक्शन ६५ प्रमाणे एखाद्या घटनेचा तपास करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पण हे करताना राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी, आ. धर्मरावबाबा आत्राम, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मनिष कलवानिया व पोलीस विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

हेलिकॉप्टर खरेदी गुलदस्त्यातनक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या सेवेत असलेल्या पवनहंस कंपनीच्या हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी सरकारला वर्षाकाठी कोट्यवधी रुपये भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे मागील सरकारने अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया केली होती. परंतू प्रत्यक्षात ते हेलिकॉप्टर अजूनही गडचिरोलीत दाखल झालेले नाही. त्याबाबत विचारले असता गृहमंत्री देशमुख यांनी राज्य शासनाकडे स्वत:चे विमानही नाही. आऊटसोर्सिंगला सरकारचे प्राधान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखGadchiroliगडचिरोली