शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन विदर्भ’ची स्वप्नपूर्ती करा

By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST

पुढील काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनीसुद्धा या बदलाचा पुढाकार घ्यावा व मेक इन विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा,

मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन : हिंगणा एमआयडीसी असो.चा वर्धापनदिननागपूर : पुढील काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनीसुद्धा या बदलाचा पुढाकार घ्यावा व मेक इन विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हिंगणा एमआयडीसी असोसिएशनच्या वर्धापनदिन समारंभात उद्योजकांना केले. मंचावर खासदार कृपाल तुमाने, असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी.एम. रणधीर, उपाध्यक्ष जी.एल. निमा व सचिव चंद्रशेखर शेगावकर होते. भारताबद्दल जगातील उद्योगपतींना कुतूहलमुख्यमंत्री म्हणाले की, जगातील औद्योगिक वातावरण झपाट्याने बदलत आहे. भारताबद्दल जगातील उद्योगपतींना कुतुहूल आहे. आपल्या देशात गुंतवणूक करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. डावोस येथील जागतिक इकॉनॉमिक फोरमच्या सभेत मला हे चित्र जाणवले. जगातील उद्योजकांसोबत संवाद साधून गुंतवणूक वाढविण्याच्या प्रयत्नासोबतच देशातील उद्योजकांसोबत संवाद वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना पूर्ण करण्यात येईल.कामगार कायदे सोपे करूउद्योग वाढीसाठी कामगार कायदे अडचणीचे ठरू नये, यासाठी सर्व समावेशक असा कामगार कायदा तयार करण्याचे प्रयत्न आहे. उद्योग आणि कामगारांच्या हिताचा सर्वसमावेशक धोरण असणारा कामगार कायदा असल्यास उद्योग वाढीसाठी त्याचा निश्चितपणे फायदा होतो. कुशल कामगार निर्मितीसाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. उद्योगांमध्ये कशा प्रकारच्या कुशलतेची गरज आहे, याची वेळोवेळी शासनास माहिती दिल्यास त्या दिशेने प्रयत्न करता येईल. यासंदर्भातला मसूदा शासन तयार करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.प्रास्तविक भाषण असोसिएशनचे अध्यक्ष सी.एम. रणधीर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात हिंगणा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात कामगार काम करीत असल्यामुळे एक सुसज्ज रुग्णालय तसेच इतर मागण्यांचा उल्लेख केला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर बेंद्रे व अमित पचेरीवाला, चंद्रशेखर शेगावकर, सहसचिव के.के. डागा व समीर खोसला, कार्यकारी सदस्य गणेश जयस्वाल, नारायण गुप्ता, एस.एम. पटवर्धन, अरुण लांजेवार, सचिन जैन यांच्यासह महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्रचे प्रकल्प प्रमुख आशुतोष त्रिपाठी, राजकुमार चोखाली आणि उद्योजक उपस्थित होते.संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)उद्योग मित्र संकल्पना आवश्यकउद्योग जगतातील अडचणी सोडविण्यासाठी उद्योग मित्र ही संकल्पना आवश्यक आहे, पण केवळ त्या ठिकाणी न थांबता थेट शासनाशी संवाद केल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात. प्रादेशिक अधिकाऱ्यांना तसे अधिकार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगपतींचा सत्कारउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी गोपाळ शिराळकर, आशुतोश दास आणि विनायक गान या उद्योगपतींचा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष बसंतलाल शाह, डी.के. तापडिया, राजीव पांडे, एस. रामलिंगम, चंदर खोसला, एस.के. मित्रा आदींचा सत्कार करण्यात आला.