धावत्या रिक्षेतून उडी मारणारी स्वप्नाली अखेर कोमातून बाहेर...
By Admin | Updated: August 22, 2014 10:05 IST2014-08-22T09:46:14+5:302014-08-22T10:05:42+5:30
अपहरणाच्या भीतीने धावत्या रिक्षेतून बाहेर उडी मारल्याने जखमी झालेली स्वप्नाली लाड ही तरूणी अखेर २१ दिवसांनी कोमातून बाहेर आली आहे.

धावत्या रिक्षेतून उडी मारणारी स्वप्नाली अखेर कोमातून बाहेर...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - धावत्या रिक्षेतून बाहेर उडी मारल्याने जखमी झालेली स्वप्नाली लाड ही तरूणी अखेर २१ दिवसांनी कोमातून बाहेर आली आहे. तिची प्रकृती स्थिर असून तिच्या शरीराची हालचाल सुरू झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ठाण्यात राहणारी स्वप्नाली १ ऑगस्ट रोजी रात्री कामावरून उशीरा परतली, रिक्षातून घरी जात असताना रिक्षावाल्याने मार्ग बदलल्याचे तिच्या लक्षात आले. आपले अपहरण होईल अशी भीती तिला वाटली आणि बचावासाठी तिने धावत्या रिक्षातून बाहेर उडी मारली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने स्थानिक नगरसेविका उषा भोईर या त्याच मार्गाने जात होत्या. त्यांनी स्वप्नालीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्याच आल्या मात्र ती कोमात गेली.
अखेर २१ दिवसांनी ती कोमाबाहेर आली असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. मात्र अद्यापही ती कोणालाही ओळखू शकत नाहीये. दरम्यान स्वप्नालीला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले असून आता तिला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.