शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भयाण वास्तव : ‘ मतपेटी’ ची ने-आण करण्यासाठीच ‘या ’ गावात येते एसटी बस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 16:57 IST

इंदापूर तालुक्यातील हे एक भयाण वास्तव...देशाला स्वातंत्र्य मिळून आता तब्बल ७२ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र,

ठळक मुद्दे७२ वर्षांपासुन कडबनवाडी मुलभुत सुविधांपासुन  वंचितच

इंदापूर (कळस) : देशाला स्वातंत्र्य मिळून आता तब्बल ७२ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या ग्रामीण डोंगर भागात आजही एसटी बस पोहचलेली नाही. केवळ मतपेटी ने आण करण्यासाठीच या गावात एसटी बस येते.सरकार कितीही बदलले तरी ग्रामीण भाग अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. या गावात अद्यापपर्यंत मूलभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. या गावात जाण्यासाठी  संपूर्ण रस्त्यावर केवळ माती आणि दगडच दिसत आहे. कडबनवाडी हजार ते अकराशे लोकसंख्येचे गाव. या गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे समोर आले आहे. येथे काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एक साधा रस्ता होता, मात्र त्यानंतर आतापर्यंत एकदाही या रस्त्याची डागडुजी झाली नाही. तसेच आतापर्यंत एकाही योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम झाले नाही. प्रशासनाच्या या उदासिनतेचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. रस्ताच नसल्यामुळे या गावात रस्ता तिथे एसटी हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस या ठिकाणी पोहचली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संपवून पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जाणाºया विद्यार्थ्यांचेही पायपीटीने प्रचंड हाल होतात. पावसाळ्यात तर या रस्त्याने पायी चालणे ही कठीण होते.  या रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही. रात्री - अपरात्री या ठिकाणी एखाद्या आजारी रुग्णला दवाखान्यात न्यायचे असल्यास प्रचंड हाल होतात. यामुळे गावकºयांना प्रचंड त्रास होत आहेआज देश विकासाची स्वप्न पाहत आहे. मात्र ,येथील नागरिक परिवहन मंडळाच्य लाल परीला गावात पाहण्यात उत्सुक्त आहेत. गावच्या विकासाच्या दृष्टीने दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. गावाचा विकास हा खुंटला आहे. यामुळे विद्यार्थी तसेच शेतकरी मजूर आणि ग्रामस्थ यांना त्रास होत आहे. .जलसंधारणाच्या माध्यमातून गावाने चळवळ निर्माण केली .मात्र ,तरीही विकास हा कोसो दुरच राहिला आहे.——————————————अवर्षणप्रवण आमच्या गावाला आजही पक्का रस्ता नाही .  गावात अजूनही मतदान मतपेटी ने -आण वगळता एसटी बसच आली नाही .रस्त्याचे काम अनेक वेळा सुरू केले व बंदही झाले . आजही गावाला रस्ता नाही. तानाजी शिंगाडे , ग्रामस्थ 

——————————— 

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानIndapurइंदापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक