शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 20:14 IST

Dr Prakash Amte Corona Positve: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. 

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr Prakash Amte) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. (dr prakash amte corona positive)

डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचं काम पाहातात. गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांना ताप होता. त्यांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली होती. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 

डॉ. प्रकाश आमटे यांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार आमटे यांना नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदवन, लोकबिरादारी प्रकल्प आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

डॉ. प्रकाश आमटे हे भारत सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी आहेत. याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅगेसेसे, मदर तेरेसा पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. 

कोरोनामुळे जीवनशैलीत बदल करण्याची गरज कोरोनानंतर शहारातील माणसांनी जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचं मत डॉ. प्रकाश आमटे यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. "कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही", अशी खंत देखील डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Dr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस