मुंबई - डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गौरीच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री १ वाजता अनंतने पोलिस ठाण्यात सरेंडर केले. त्याला अटक करत सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
फॉरेन्सिक टीमकडून घरात झाडाझडतीअनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घरी धाव घेतली. गौरीने नेमकी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली? याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहे.
Web Summary : Dr. Gauri Palve's husband, Anant Garje, PA to Minister Pankaja Munde, was arrested in connection with her suicide. He surrendered and is in police custody until November 27th. Forensic teams are investigating his residence for evidence.
Web Summary : डॉ. गौरी पालवे की आत्महत्या के मामले में पति अनंत गर्जे, मंत्री पंकजा मुंडे के पीए, गिरफ्तार। उसने आत्मसमर्पण कर दिया और 27 नवंबर तक पुलिस हिरासत में है। फोरेंसिक टीम सबूत के लिए उसके घर की जांच कर रही है।