नीटचे सर्व्हर दुस-या दिवशीही डाऊनच
By Admin | Updated: April 23, 2017 18:56 IST2017-04-23T18:39:31+5:302017-04-23T18:56:17+5:30
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (नीट) परीक्षेच्या हॉल तिकीटची प्रिंट आऊट काढण्यासाठी

नीटचे सर्व्हर दुस-या दिवशीही डाऊनच
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (नीट) परीक्षेच्या हॉल तिकीटची प्रिंट आऊट काढण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. मात्र दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे. पहिल्या दिवशी सर्व डाऊन असल्यामुळे हॉलतिकिट निघाले नाही. दुसऱ्या दिवशी हॉलतिकिट निघण्याच्या आशेने विद्यार्थी दिवसभर प्रयत्न करत होते. मात्र हॉलतिकिट काही निघाले नाही. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या नीट परीक्षेचे हॉलतिकिट सीबीएसईएनईईटी या वेबसाईटवर शनिवारी सकाळी अपलोड करण्यात आले आहे. अपलोड केल्याच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजेपासूनच सर्वर डाऊन असल्यामुळे दिवसभर कोणालाही हॉलतिकिट काढता आले नाही. किमान दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २३) सर्वर सुरु होण्याची विद्यार्थ्यांना आपेक्षा होती. मात्र वेबसाईटचे सर्वर दुसऱ्या दिवशीही डाऊनच असल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकिट काढता आले नाही. यामुळे हॉलतिकिटमध्ये एखादी चुक झाली असेल तर ती दुरुस्त केव्हा करता येणार याविषयी कोणतीही गाईडलाईन मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट परीक्षा आवघ्या १५ दिवसावर आलेली असताना असा प्रकार घडत असल्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत आहेत.
तक्रार कोणाकडे करावी?
नीट परीक्षेची हॉलतिकिट मिळविण्यात आडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी परीक्षार्थींनी सीबीएसई कडे इममेल, फोनद्वारे केल्या होत्या. मात्र या तक्रारींची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. यातच मुंबई आणि दिल्ली येथेच नीटचे नियोजनाचे केंद्र असल्यामुळे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून लोकमतकडे याविषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दिल्ली, मुंबईतील नीट केंद्राचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे परीक्षार्थींसह पालकही चिंतेत आहेत. ऐनवेळी काही गडबड झाल्यास विद्यार्थ्यांच्या नुकसानीला कोण जाबाबदार राहणार असा सवाल पालकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.