अंबाबाई दर्शनासाठी आलेल्याचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: February 12, 2015 02:55 IST2015-02-12T02:55:50+5:302015-02-12T02:55:50+5:30
‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी नगरहून आलेल्या दिलीप कुऱ्हाडे (४८) या भाविकाचा मृतदेह बुधवारी सकाळी जोतिबा रोडवरील राजलक्ष्मी हॉलमध्ये आढळला.

अंबाबाई दर्शनासाठी आलेल्याचा संशयास्पद मृत्यू
कोल्हापूर : ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी नगरहून आलेल्या दिलीप कुऱ्हाडे (४८) या भाविकाचा मृतदेह बुधवारी सकाळी जोतिबा रोडवरील राजलक्ष्मी हॉलमध्ये आढळला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. दर्शन घेऊन कुऱ्हाडे रात्री जोतिबा रोडवरील राजलक्ष्मी यात्री निवास हॉलमध्ये झोपले. बुधवारी सकाळी हॉलच्या कर्मचाऱ्यांना ते निपचित पडल्याचे दिसून आले.