शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे प्रवाशांना डबल ‘जॅकपॉट’

By admin | Updated: September 11, 2014 03:28 IST

मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गासाठी रेल्वे बॉर्डाकडून ९00 कोटी रुपये खर्च प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गासाठी रेल्वे बॉर्डाकडून ९00 कोटी रुपये खर्च प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यात परेल टर्मिनसच्या कामाचाही खर्च असून, त्यामुळे परेल टर्मिनसचा मार्गही मोकळा झाला आहे. मध्य रेल्वे प्रवाशांसाठी हा एकप्रकारे डबल जॅकपॉटच लागला आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून त्वरित निधी उपलब्ध झाला की या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गाच्या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची कामे २0१४ च्या अखेरीस पूर्ण केली जाणार होती. मात्र निधीच उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे रखडली होती. यात सीएसटी ते कुर्ला या पाचव्या-सहाव्या मार्गाचा समावेश होता. एकूण ९00 कोटी रुपये किंमत असलेल्या या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पाचे कामच सुरू झाले नव्हते. या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पडून होता. अखेर पाचव्या-सहाव्या मार्गाच्या या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कुर्ला ते सीएसटी अशा पाचव्या-सहाव्या मार्गात अनेक अडथळे असून, हा प्रकल्प परेलपर्यंतच नेण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. परेलपुढे पाचव्या-सहाव्या मार्गासाठी लागणारी जागाच उपलब्ध नसून अनेक ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळेच परेलपर्यंतच या मार्गाचे काम करण्याचा विचार आहे. त्याचबरोबर दादर स्थानकातील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी म्हणून परेल टर्मिनसचा नवीन प्रस्तावही मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला होता. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रस्तावातच या प्रस्तावाला समाविष्ट करण्यात आले आहे. परेल टर्मिनसाठी ८0 कोटी रुपये खर्च येणार असून, मंजूर करण्यात आलेल्या ९00 कोटी रुपयांच्या खर्चात परेल टर्मिनसचाही खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)