शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

काळजी करू नका; परिवाराचं मी पाहतो; अजित पवारांचे वक्तव्य; पटोलेंना दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 05:28 IST

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर बोलताना पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘आमचा परिवार आणि आमचा पक्ष कसा व्यवस्थित ठेवायचा, याची काळजी करू नका. मी पाहतो आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरीला जाण्याआधी पुण्यात साखर संकुलमध्ये ते काही वेळ थांबले होते. तिथे त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. शाह यांना जयंत पाटील भेटलेच नाहीत. भेटले असे सांगतात ते धादांत खोटे आहे. ते सांगतात ते बरोबर आहे. ते आदल्या दिवशी पवार साहेबांबरोबर होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांच्याबरोबरच होते. ते इकडे आले, शाह यांना भेटले, यात काहीही तथ्य नाही,’ असे पवार म्हणाले. ‘तुम्ही प्रवेश  केला, त्यावेळी तुम्हीही आम्ही भेटलोच नाही, असे सांगितले होते,’ याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ‘मी खरोखरच भेटलो नव्हतो. पाठिंबा दिला त्यानंतरच भेट घेतली. आधी भेट झाली  नव्हती.’ 

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर बोलताना पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सांगितले.

जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेटमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. जयंत पाटील भाजपसोबत जाणार, अशी चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते कुठेही जाणार नाहीत, असे ठणकावून सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

या भेटीबाबत जयंत पाटील म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. ३१ ॲागस्ट आणि १ सप्टेंबर रोजी विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ची बैठक मुंबईत होत आहे. त्या बैठकीच्या नियोजनाबाबत या भेटीत चर्चा झाली. इतर कुठलीही चर्चा झाली नाही. शरद पवार १७ ॲागस्टपासून पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याचे समजते.

  आपण भाजपसोबत जाणार या अफवा असल्याचे जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले आहे. या मुद्यांवरून महाविकास आघाडीतही संभ्रमाचे वातावरण आहे. ते दूर करण्याचा प्रयत्न या भेटीत जयंत पाटील यांनी केला असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील