शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"सर्व्हेंवर विश्वास ठेवू नका, मविआ विधानसभा निवडणुकीत एवढ्या जागा जिंकेल’’, संजय राऊतांचं भाकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 11:45 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या ओपिनियन पोलवर सडकून टीका केली आहे. तसेच ओपिनियन पोल हे ब्रह्मदेवानं तयार केलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर आता विविध वृत्तसंस्थांकडून केले जाणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. त्यात नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या एका ओपिनियन पोलमधून महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या ओपिनियन पोलवर सडकून टीका केली आहे. तसेच ओपिनियन पोल हे ब्रह्मदेवानं तयार केलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत १७५ ते १८० जागांवर विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राचा अंदाज वर्तवणाऱ्या ओपिनियन पोलबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे ब्रह्मदेवानं केलाय का?, मोदींनी ३५० जागा मिळतील म्हणून याच लोकांनी सर्व्हे केला होत ना, लोकसभेत भाजपाला ३५० जागा मिळतील आणि महाराष्ट्रात महायुतीला ४० जागा मिळतील, असा दावा करणारी हिच ती लोकं आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही १७५ ते १८० जागा जिंकू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, या सर्व्हेंवर विश्वास ठेवू नका. हे जे सर्व्हे येताहेत ते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. हे काम सुरू झालंय, याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होताहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला. 

टाइम्स नाऊ-मॅट्रिझ यांचा सर्व्हे नुकताच प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेनुसार राज्यात आज निवडणुका झाल्यास भाजपा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळू शकतात. तर शिवसेना शिंदे गटाला १९ ते २४ जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ७ ते १२ जागांवरत समाधान मानावे लागू शकते. अशा प्रकारे महायुतीला आजच्या घडीला निवडणूक झाल्यास १२१ ते १४१ जागा मिळू शकतात, असा दावा करण्यात आला होता.

तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ४२ ते ४७ जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २३ ते २८ जागा मिळू शकतात. अशा प्रकारे सद्यस्थितीत महाविकास आघाडीला ९१ ते १०६ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. याशिवाय अपक्ष आणि  इतर पक्षांच्या खात्यामध्ये ११ ते १६ जागा जातील, अशी शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ४० ते ४२ जागांवर अत्यंत चुरशीची लढत असल्याचेही या सर्व्हेमध्ये म्हटले होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४