शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 21:22 IST

बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उंचीवरुन सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य

ठाणे: इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरुन सध्या सरकारवर टीका सुरू आहे. विरोधकांना जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं, यासाठीच आता त्यांच्याकडून टीका केली जात आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावं लागेल, तरी आम्ही ते करु, असंही मुख्यमंत्री म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 61 वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. 'बाबासाहेबांची उंची मोजू नका. पुतळ्याच्या आराखड्यात तसूभरही बदल केलेला नाही,' असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी विरोधकांना दिलं. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली नाही. मात्र आपलं सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या 3 दिवसांमध्ये निर्णय घेतला आणि इंदू मिलची जमीन स्मारकासाठी दिली. आपण जे करुन दाखवलं, ते काँग्रेस-राष्ट्रवादीला जमलं नाही. त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखतं आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. बाबासाहेबांबद्दल वाद निर्माण करू नका, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी प्रसंगी राज्यदेखील गहाण ठेवू, असं मुख्यमंत्री म्हणाले.मोदी सरकार बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलणार असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जातो. या आरोपांनाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. 'खोटं बोल, पण रेटून बोल, असं सध्या काही जणांकडून सुरू आहे. संविधान आहे, म्हणून आज सर्वकाही आहे. त्यामुळे हे संविधान कोणीच बदलू शकत नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपा सरकार समाजातील सर्व घटकांसाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'मोदींनी अॅट्रॉसिटीचा कायदा मंजूर करुन घेतला. आरक्षण कायम ठेवलं. मराठा समाजालादेखील आम्ही नक्की आरक्षण देऊ. मात्र त्यासाठी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही,' अशी हमी फडणवीसांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस