शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

"देशातील जनतेची दिशाभूल करू नका", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 20:56 IST

Devendra Fadnavis : शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी सादर करत महायुतीवर निशाणा साधला. याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला.महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही घटक पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 50 जागा मिळाल्या तर दुसरीकडे महायुतीला 231 जागा जिंकल्या. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. तसेच, शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी सादर करत महायुतीवर निशाणा साधला. याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी सादर करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा." 

याचबरोबर, "2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या", असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, असे म्हटले आहे. तसेच, शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्याची अपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. मात्र, मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. उगीच आरोप करणं योग्य नाही. कारण त्यासंबंधी ठोस असे पुरावे माझ्या हातात नाहीत. पण मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत. काँग्रेस पक्षाला 80 लाख मते पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास 41 आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते 72 लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त 10 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 58 लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले, याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी