शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘’दर वाढले म्हणून बोंबलू नका, कांदा परवडत नसेल तर मुळा, लसूण खा’’ बच्चू कडूंचा सल्ला

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 13:02 IST

Bacchu Kadu Statement on onion Price : कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देदर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खाकेंद्र सरकारने इराणमधून कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेकांद्याचे भाव वाढले पाहिजेत कारण ७० वर्षांचा अनुशेष बाकी आहे

अमरावती - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले कांद्याचे भाव परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर मोठ्याने भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा, असा सल्ला राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.कांद्याचा भाव वाढण्यामागचं कारण सांगताना बच्चू कडू म्हणाले की, केंद्र सरकारने इराणमधून कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाने ओरडू नये. कांद्याचे भाव वाढले पाहिजेत कारण ७० वर्षांचा अनुशेष बाकी आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल, त्यांनी मुळा, लसूण खावी, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला.

दरम्यान, उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ७० रुपयांनी त्याची विक्री होत होती.किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. मध्यम दर्जाचा कांदा ६० रुपये व चांगल्या दर्जाचा कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. सद्य:स्थितीत मुंबईमध्ये नाशिक, पुणे, अहमदनगरमधून कांद्याची आवक होत आहे. उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर वाढल्यामुळे मुंबईमध्येही प्रतिदिन भाव वाढत आहेत.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूonionकांदाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMarketबाजारFarmerशेतकरी