शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात राहू नये; शिंदे गटाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 11:53 IST

BJP Oppose Shrikant Shinde: विरोध हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून मुलाची उमेदवारी जाहीर करायला लावली आहे.

श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी देण्यावरून भाजपात विरोधाचे वातावरण आहे. यामुळेच अद्याप शिंदे यांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली नव्हती. हा विरोध हाणून पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द देवेंद्र फडणवीसांच्याच तोंडून मुलाची उमेदवारी जाहीर करायला लावली आहे. तरीही भाजपाचा विरोध शमेल असे दिसत नाहीय. यातच आता शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत. ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थकांनी भाजप कार्यकर्ता असल्याचे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी केला आहे. 

गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात त्यांनी राहू नये, असा इशाराही लांडगे यांनी दिला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये, त्यामुळे युतीचे वातावरण बिघडू शकते. युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावे आणि त्या दृष्टीने असे जे काही लोक युतीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील त्यांनी केली.  

गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अन्यथा काम करणार नाही, असा इशारा दिला होता. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४