शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनातील अडचणी निकाली, दोंडाईचा सौरऊर्जा प्रकल्पाला अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट म्हणून मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:16 IST

हाराष्ट्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०१५ अंतर्गत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निकाली काढण्यात आल्या असून, या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०१५ अंतर्गत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निकाली काढण्यात आल्या असून, या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा ५०० मेगावॉटचा सौरऊर्जा निर्मितीचा प्रकल्प अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला मान्यता मिळणार आहे. हा प्रकल्प महानिर्मिती पूर्ण करणार असून, पूर्ण प्रकल्पासाठी एकूण १,०२४ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी ८२५ हेक्टर जमीन महानिर्मितीने विकत घेतली आहे. महानिर्मितीला राज्यात २,५०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प निर्मितीचे लक्ष्य देण्यात आले असून, त्यापैकी ५०० मेगावॅटच्या या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे. महानिर्मितीने ८२५ हेक्टर खासगी जागा विकत घेतली असून, मेथी आणि विकरण या दोन गावांतील ही जमीन आहे. भूसंपादनाचे १४.६३ कोटी महानिर्मितीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहेत.केंद्र शासानाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने धुळे जिल्ह्यातील या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम केंद्र शासनाची प्राधिकृत असलेली सेकी ही संस्था करणार आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेच्या शासकीय परिपत्रकानुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. याशिवाय मराठवाडा भागासाठीही एक ५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आली.१६० कोटींचा खर्च- दोंडाईचा हा सौरऊर्जेचा ५०० मेगावॅटचा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिला टप्पा २५० मेगावॅटचा मार्च २०१९ पर्यंत पूर्ण केला जाईल. दुसरा २५० मेगावॅटचा टप्पा २०२१-२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. १६० कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला होणार आहे.प्रकल्पासाठी लागणारी वीजवाहिनी टाकण्याचे काम महापारेषण करणार आहे. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज वाहून नेऊन महापारेषणच्या उपकेंद्रात आणली जाईल आणि तेथून ती शेतकºयांना दिली जाईल. ही वीजवाहिनी १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा कालावधी महापारेषणला देण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे