शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गुरुपौर्णिमेला साईबाबांना प्लाझ्माचे दान; साईसंस्थानचे कोरोनामुक्त भाविकांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:58 AM

स्वेच्छेने व बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझ्मा दान देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी आपल्या जवळच्या रक्तदान केंद्रावर जाऊन यासाठी रक्तदान करावे.

शिर्डी : देशभरातील लाखो रूग्ण कोविड आजारावर मात करून पूर्ण बरे होत आहेत़ यात साईबाबांवर अढळ श्रद्धा असणाऱ्या व बाबांना गुरूस्थानी मानणाºया भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. कोरोनामुक्त झालेल्या या भाविकांनी यंदा गुरूपौर्णिमेनिमित्त रक्तातील प्लाझ्माचे दान करावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.

स्वेच्छेने व बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझ्मा दान देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी आपल्या जवळच्या रक्तदान केंद्रावर जाऊन यासाठी रक्तदान करावे. तसेच त्यांनी त्यांचा फोटो, नाव, पत्ता व डोनेशन कार्ड संस्थानला माहितीसाठी saibaba@sai.org.in या मेलवर पाठवावे.

साईबाबांना गुरूपौर्णिमेलाच नाही तर वर्षभर दान देणारे देशभरात लाखो भाविक आहेत़ पीडित रूग्णांवरील प्रभावी उपचारासाठी कोविड आजारावर मात करून बरे झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्माची गरज आहे़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आवाहन केले आहे़ ही साईबाबांसाठी अमूल्य गुरूदक्षिणा असेल, असे डोंगरे यांनी म्हटले आहे़रक्तदान शिबिराचे आयोजनसाईसंस्थानच्या रूग्णालयालाही सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे़ रक्ताच्या उपलब्धतेसाठी संस्थानच्या रक्तपेढीने यंदा गुरूपौर्णिमेच्या दिवशी साईआश्रम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे़ साईसंस्थानच्या रक्तपेढीकडे रक्तातील प्लाझ्मा वेगळा करणारी यंत्रणा आहे़ मात्र त्यासाठी लागणारी संबंधित संस्थेची अनुमती नाही़ संस्थानचे रूग्णालय प्रशासन ही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी सांगितले़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस