डोंबिवलीतील प्रवाशाचे दागिने लंपास

By Admin | Updated: May 10, 2017 02:23 IST2017-05-10T02:23:21+5:302017-05-10T02:23:21+5:30

डोंबिवली येथील प्रवाशाचे सहा लाखांचे दागिणे चोरट्यानी लंपास केले. याबाबत संबंधित प्रवाशाने रेल्वे पोलिसांत तक्रार केली

Dombivli Passenger Jewelry Lampas | डोंबिवलीतील प्रवाशाचे दागिने लंपास

डोंबिवलीतील प्रवाशाचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज (जि.सांगली) : डोंबिवली येथील प्रवाशाचे सहा लाखांचे दागिणे चोरट्यानी लंपास केले. याबाबत संबंधित प्रवाशाने रेल्वे पोलिसांत तक्रार केली असून, हद्दीच्या वादामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार मुंबई-कोल्हापूर प्रवासादरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
५ मे रोजी ही घटना घटली. डोंबिवली येथील कुटुंब नातेवाईकांच्या विवाहासाठी महालक्ष्मीमधून मिरजेला जात होते. त्यांच्याकडील बॅगेत वीस तोळे सोन्याचे दागिने असलेला डबा होता. संबंधित कुटुंब मिरजेत उतरुन लग्नठिकाणी पोहोचल्यानंतर बॅगेतील दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीबाबत रेल्वे पोलिसांत तक्रार केल्यानंतर चोरी धावत्या रेल्वेत झाली की मिरजेत उतरल्यानंतर रिक्षाने कार्यक्रमस्थळी जाताना झाली, याबाबत वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी फिर्यादीस पिटाळून लावले. चोरी नेमकी कोठे झाली, हे निश्चित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Dombivli Passenger Jewelry Lampas