शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

डोंबिवली हादरली...

By admin | Published: May 27, 2016 4:39 AM

सागर्ली गावानजीक असलेल्या एमआयडीसी फेज-२मधील ‘प्रोबेस एंटरप्रायजेस’ या रासायनिक कंपनीत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता झालेल्या बॉयलरच्या स्फोटाने डोंबिवलीचा

डोंबिवली : सागर्ली गावानजीक असलेल्या एमआयडीसी फेज-२मधील ‘प्रोबेस एंटरप्रायजेस’ या रासायनिक कंपनीत गुरुवारी सकाळी ११.३० वाजता झालेल्या बॉयलरच्या स्फोटाने डोंबिवलीचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा परिसर हादरला. या भीषण स्फोटात कंपनीतील दोन कामगार, एक बैलगाडीमालकासह सहा जण ठार झाले. तर, परिसरातील इमारतींमधील रहिवासी, पादचारी, दुचाकीचालक असे १४० नागरिक जखमी झाले असून, त्यातील ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, स्फोट झाला तेव्हा कंपनीत ६ कामगार हजर होते, अशी माहिती एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले यांनी दिली. कंपनीचे मालक नीलेश विश्वासराव वाकटकर यांची नंदन व सुमीत ही दोन मुले, सून आणि शेजारील कंपनीतील भोसले नावाचा कामगार अद्याप सापडले नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा स्फोट इतका भीषण होता की, घटनास्थळाच्या परिसरातील पंचवीसहून अधिक इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या. मानपाडा रस्ता, शिवाजी उद्योगनगरमधील आइस फॅक्टरी परिसरातील बहुतांशी दुकानांचे शटर तुटले. विविध दुकाने, लहान कारखाने, कार्यालये यांच्यातील इंटिरिअरच्या काचांचा खच पडला होता. सागर्ली परिसरात किंकाळ्या, महिलांसह मुलाबाळांची एकच धावपळ, आरडाओरडा यामुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला. मृत कर्मचाऱ्यांपैकी एकाचे नाव महेश पांडे आहे. तर, दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही. ज्ञानेश्वर हजारे (रा. आंतर्ली) असे मृत बैलगाडीमालकाचे नाव आहे. राजू शिरगिरे, नीलम देढे हेही ठार झाले असून, आणखी दोघांची नावे समजू शकली नाहीत. सागर्ली परिसरातून अनेक जण गांधीनगर, मानपाडा रस्ता, एकतानगर, संगीतावाडी परिसरात धावत होते. परिसरातील दुचाकी, चारचाकी गाड्यांचे सुटे भाग घरे, रस्त्यांवर उडाले. प्रचंड गोंधळ, वाहतूककोंडी, बघ्यांच्या गर्दीमुळे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. आणखी स्फोटाची भीतीप्रोबेस कंपनीची पूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली. त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली रसायने साठवलेले ड्रम असण्याची शक्यता असल्याने आणखी स्फोट होऊ शकतात, असे पोलिसांनी सांगितले. त्या कंपनीलगतच असलेल्या ‘हर्बर्ट ब्राऊन’ आणि ‘फाइन केमिकल्स’ या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. फाइन कंपनी मागील वर्षभरापासून बंद होती. गोदामासाठी तिचा वापर केला जात होता. त्यातील सहा कर्मचाऱ्यांना अपघाताची झळ बसली. त्यातील दोघे किरकोळ जखमी आहेत. तर, अन्य सुखरूप असल्याचे कंपनीचे मालक अमोल कामत यांनी सांगितले. रात्री उशिरा ‘हर्बर्ट ब्राऊन’ कंपनीला पुन्हा आग लागली असून, ती विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.उच्चस्तरीय चौकशी करणारघटनास्थळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागह नेते राजेश मोरे यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी भेट दिली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मृतांच्या वारसांना शासकीय मदत देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महापौर देवळेकर आणि सभागृह नेते मोरे यांनी डोंबिवली एमआयडीसी हटवण्यासाठी महासभेत ठराव मंजूर करणार असल्याचे सांगितले. स्फोटाचे नेमके कारण गुलदस्त्यातचअ‍ॅनेस्थेशियासाठी लागणाऱ्या १२ रसायनांचा साठा प्रोबेस कंपनीत होता. ही रसायने ज्वलनशील आहेत. स्फोटाचे कारण कळले नसले तरीही वातावरणातील आणि बॉयलरची उष्णता, या कारणांमुळे स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवली गेली. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या नसल्याचेही स्पष्ट झाले. तसेच अपघाताच्या वेळी कंपनीत नेमके किती कर्मचारी होते, याचा आकडाही मिळू शकलेला नाही. बैलाचाही मृत्यू कंपनीच्या ठिकाणाहून रसायनाची ने-आण करण्यासाठी २५ हून अधिक बैलगाड्या नेहमी येत असतात. परंतु, गुरुवारी आंतर्ली गाव परिसरात लग्न असल्याने बहुतांशी बैलगाडीवाले तेथे आले नव्हते. ज्या पाच बैलगाड्या तेथे आल्या होत्या, त्यापैकी दोन बैलगाड्यांचे पूर्ण नुकसान झाले आणि दोन बैलांनाही गंभीर दुखापत झाली. त्यापैकी एका बैलाच्या पायातील त्राणच गेल्याने त्या बैलाला एका टेम्पोतून मुंब्रा आणि नंतर मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच तेथे मानपाडा पोलीस ठाण्याचे शांताराम अवसारे, टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ मदतकार्याला सुरुवात करत बघ्यांची गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतरही तीन तास आग आणि धुराचे लोट पसरले होते. त्यातच, आजूबाजूच्या चार कंपन्यांमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. तर, काही सिलिंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. दोषींवर कठोर कारवाई करणार - मुख्यमंत्रीस्फोटाच्या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल. ज्या घरांचे नुकसान झाले त्यांना पंचनामा झाल्यानंतर भरपाई देण्याबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यापूर्वी त्यांनी सकाळी ‘टिष्ट्वटर’वर या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. तसेच घटनास्थळी तत्काळ मदतकार्य करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेसह महापालिका प्रशासनाला दिले होते. आग तीन तासांनी नियंत्रणातकल्याण-डोंबिवली पालिकेसह अंबरनाथ, उल्हासनगर आणि ठाणे आदी भागांतील अग्निशमन दलाच्या २० गाड्या व कर्मचारी घटनास्थळी आले होते. बंब, १५हून अधिक पाण्याचे खासगी टँकर यांच्या साहाय्याने तीन तासांनंतर दुपारी अडीच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. एनडीआरएफ घटनास्थळीपुणे-तळेगाव येथून राष्ट्रीय आपत्ती दलाचीही (एनडीआरएफ) तुकडी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी परिसराचा ताबा घेतला. १५हून अधिक रुग्णवाहिकांमधून जखमींना नेले जात होते. तसेच प्लाझ्मा ब्लड बँकेत इच्छुकांनी रक्तदान करण्यासाठी धाव घेतली.मालकावर गुन्हा दाखल करणारप्रोबेस कंपनीचे मालक नीलेश विश्वासराव वाकटकर दुपारी ३ वाजेपर्यंत घटनास्थळी आले नव्हते. या दुर्घटनेचा मानसिक धक्का बसल्याने ते एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर निष्काळजीपणा, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.हेलिकॉप्टरद्वारे पाहणीया स्फोटाची तीव्रता लक्षात यावी, यासाठी घटनास्थळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करण्यात आली.चार रुग्णालयांत उपचारजखमींना आयकॉन, एम्स, शिवम्, नेपच्युन, महापालिकेच्या शास्त्रीनगर आदी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.